एशियन पेंट्स 3 टक्क्यांनी नुकसानीत : सेन्सेक्स- निफ्टी नुकसानीसह बंद
मुंबई : भारतीय भांडवली बाजारात गुरुवारचे सत्रही घसरणीसोबत बंद झाला आहे. यामध्ये दिग्गज क्षेत्रांपैकी रियल इस्टेट व ऊर्जा क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच धातू व एफएफसीजीच्या क्षेत्रातील समभागात विक्रीचा कल राहिल्याची नोंद केली आहे. प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीसोबत दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 139.18 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 59,605.80 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 43.05 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,511.25 वर बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरी दरम्यान निफ्टी काही वेळ 17,620 पर्यंत उच्चांकावर तर 17,455.40 पर्यंत खाली गेला होता.
दिग्गज कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, आयटीसी, टाटा मोर्ट्स, स्टेट बँक, टाटा स्टील, सनफार्मा, मारुती सुझुकी, टीसीएस यांचे समभाग लाभात राहिले होते. तसेच अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि टायटन यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते. गुरुवारच्या सत्रात आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँग व चीनचा शांघाय कम्पोजिट हे नुकसानीत राहिले. तसेच दक्षिण कोरियाचा कॉस्पी हा नफा कमाईत होता. जपानचा निक्की हा बंद होता. तसेच युरोपीयन शेअर बाजार हे तेजीसह बंद झाले आहेत. अमेरिकन बाजारात मिळता जुळता कल राहिला आहे. या दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.32 टक्क्यांनी वाढून 80.86 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून बुधवारी निव्वळ 579.82 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली आहे. आठवड्यातील बाजाराचा आजचा अंतिम दिवस असल्यामुळे आज बाजार तेजीच्या की घसरणीच्या वळणावर बंद हेणार आहे हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यामुळे जागतिक व देशातील राजकीय सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे काय परिणाम होणार याकडे पाहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट पेले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- अॅक्सिस बँक 845
- आयटीसी 387
- स्टेट बँक 520
- टाटा मोर्ट्स 433
- टाटा स्टील 111
- सनफार्मा 973
- मारुती सुझुकी 8691
- टीसीएस 3414
- कोटक महिंद्रा 1707
- एचसीएल टेक 1096
- टेक महिंद्रा 1128
- आयसीआयसीआय 840
- बजाज फायनान्स 6202
- गेल 98
- फेडरल बँक 127
- हिंडाल्को 438
- डाबर इंडिया 540
- अदानी पोर्ट 552
- अंबुजा सिमेंट 337
- सीजी कझ्युमर 298
- बीपीसीएल 320
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एशियन पेंट्स 2706
- लार्सन अॅण्ड टुब्रो 2159
- इंडसइंड बँक 1078
- भारती एअरटेल 762
- टायटन 2394
- बजाज फिनसर्व्ह 1347
- इन्फोसिस 1551
- एचडीएफसी बँक 1603
- पॉवरग्रिड कॉर्प 213
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2367
- एचडीएफसी 2602
- एनटीपीसी 169
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1313
- अल्ट्राटेक सिमेंट 7183
- विप्रो 393
- हिंदुस्थान युनि 2487
- नेस्ले 18645
- अशोक लेलँड 140
- मॅक्स फायनान्स 690
- एसीसी 1737
- बँक ऑफ बडोदा 155