रेटिंग एजन्सी इक्राच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशामध्ये दुचाकी वाहनांची मागणी कमी झाली आहे. यामध्ये प्रवासी व व्यावसायिक वाहनांची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत तेजीत पहावयास मिळाली आहे, अशी माहिती रेटिंग एजन्सी इक्रा यांच्याकडून करण्यात आलेल्या एका सर्वेमधून देण्यात आली आहे.
इक्राने यावेळी सांगितले की, वाहन विक्रेत्यांना खूप प्रतिकूल वातावरणाशी टक्कर द्यावी लागली आहे. दुचाकीची मागणी कमी व पुरवठय़ात अडचणीचा सामना करावा लागला आहे. प्रवासी वाहनांची विक्री आणि ट्रक्टरची विक्रीदेखील प्रभावीत झाली आहे.
विविध विभागातील मागणी व पुरवठा, यामध्ये ग्रामीण व शहरी तसेच महानगरांमधील क्षेत्रातील दुचाकी, प्रवासी, व्यावसायिक वाहने आणि ट्रक्टरांची विक्री करणाऱया 22 डिलर्सकडून सविस्तर माहिती एकत्रित करण्यात आली.
प्रवासी, व्यावसायिक वाहन विक्री सकारात्मक
सर्वेमध्ये जवळपास 53 टक्के जणांनी यावेळी संकेत दिले आहेत, की प्रवासी वाहन व व्यावसायिक वाहन यांनी मागील वर्षाच्या तुलनेत काहीशी मजबूत कामगिरी केली आहे.