Tarun Bharat

दाऊदचा हस्तक ‘सलीम फ्रूट’ला NIA कडून अटक

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमसाठी (dawood ibrahim) हवाला रक्कमेची फेरफार करत असल्याच्या संशयावरून सलीम फ्रूटला (Salim Fruit) राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) गुरुवारी ही कारवाई केली आहे. (NIA arrests Chota Shakeel’s associate Salim Fruit in Mumbai)

मुंबई सेंट्रलमधील अरब लेन भागातून सलीम मोहम्मद इक्बाल उर्फ सलीम फ्रुट याला अटक करण्यात आली. तस्करी, अमली पदार्थांद्वारे दहशतवादी कृत्ये, मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेऊन तो निधी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायद्यासारख्या संघटनांना पुरवणे असे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. म्हणून त्याला National Investigation Agency ने अटक केली. पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. PMLA ने याआधी सलीम फ्रूटचं स्टेटमेंटदेखील नोंदवलं आहे. छोटा शकीलच्या पाकिस्तानच्या घरी सलीम तीन ते चार वेळा गेल्याची देखील माहिती आहे. २००६ मध्ये UAE मधून सलीम फ्रूटची हकालपट्टी करण्यात आली आहे. तो छोटा शकीलसाठी खंडणी वसूल करायचा. २००६ मध्येही त्याला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार?

Related Stories

उत्तर रत्नागिरीत चक्रीवादळाने अतोनात नुकसान , पंचनामे सुरू

Abhijeet Shinde

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Abhijeet Shinde

पोळने जेधे, शेख, भंडारी यांचे खून माझ्यासमोर केले

Patil_p

सांगली जिल्हा वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त 106 कोटी निधी

Sumit Tambekar

आमदार आबिटकरांच्या प्रयत्नाने तुळशी प्रकल्पग्रस्तांना पाणी परवाने

Sumit Tambekar

सातारा जिल्ह्यात १४ रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १४५ निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!