सलिम खान आणि सलमान खान यांना धमकीच पत्र आल्यानंतर सोशल मिडियातून यासंदर्भात उलट- सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान कायदा आणि सुव्यस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. सलमान खानचं घर आणि ज्या ठिकाणी हे धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून जे कोणी संशयित आरोपी सापडतील त्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय. सलमान खान आणि त्यांच्या वडिलांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रेकी करून ती चिठ्ठी ठेवण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे.
नेमके प्रकरण काय
सलिम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलेलं होतं. यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांची पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणं मारण्यात येईल अशा आशयाचे पत्र ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर सलिम खान यांनी पोलिस स्टेशनाचत याबाबत तक्रार नोंदवली आहे.


previous post