Tarun Bharat

सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला

Advertisements

मुलाखतीवेळी घटना ः एअर ऍम्ब्युलन्सने इस्पितळात हलवले

न्यूयॉर्क / वृत्तसंस्था

भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चौटाका इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुलाखत सुरू असतानाच त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मुलाखत सुरू असतानाच हल्लेखोर स्टेजवर धावत सुटला आणि त्याने सलमान रश्दी आणि मुलाखतकारावर चाकूने वार केल्याने ते अत्यवस्थ झाले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्समधून उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे वय सुमारे 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्दींच्या मानेवर चाकूचे वार झाल्यामुळे ते रक्ताच्या थारोळय़ात पडले. याचदरम्यान हल्लेखोराने मुलाखतकाराच्या डोक्मयाला किरकोळ दुखापत केली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  एका कार्यक्रमादरम्यान भाषण देण्यासाठी व्यासपीठावर आले असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

75 वषीय सलमान रश्दी यांनी आपल्या स्वतंत्र लेखनकौशल्यातून जगभरात ओळख निर्माण केली. रश्दी यांनी 1975 मध्ये ‘ग्रायमस’ या आपल्या पहिल्या कादंबरीद्वारे लेखक क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या दुसऱया कादंबरीसाठी त्यांना 1981 मध्ये ‘बुकर पुरस्कार’ आणि 1983 मध्ये ‘बेस्ट ऑफ द बुकर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या कादंबरीतून रश्दींना सर्वाधिक ओळख मिळाली. द जग्वार स्माईल, द मूर्स लास्ट साई, द ग्राउंड बीनथ हर फीट आणि शालीमार द क्लाउन यासह अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. मात्र, ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ हय़ा वादग्रस्त पुस्तकामुळे ते चर्चेत आले. ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ ही सलमान रश्दी यांची चौथी कादंबरी आहे. या कादंबरीवर भारतासह जगातील अनेक देशांमध्ये बंदी आहे. ही कादंबरी 1988 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर बराच वाद झाला होता. या कादंबरीतील लिखाणातून मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.  या प्रकाशनानंतर रश्दींना जीवे मारण्याच्या धमक्मया आल्या होत्या.

Related Stories

अफगाण दहशतवादी हल्ल्यात अनेक बालके ठार

Patil_p

भारतीय पाणबुडीवर घुसखोरीचा पाकचा आरोप

Patil_p

रशियाच्या कोळशावर पाश्चात्यांची बंदी

Patil_p

अमेरिका : चिंता नको

Patil_p

तामिळनाडूचा तरुण युक्रेनच्या सैन्यात सामील

Abhijeet Shinde

आजारांना हुंगणारे ‘नाक’

Patil_p
error: Content is protected !!