न्यूयॉर्क
अमेरिकेमधील प्राणघातक चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेले भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. तसेच आता त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला आहे. रश्दी यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी मंगळवारी सांगितले. त्यांची प्रकृती आता धोक्मयाबाहेर आहे. या हल्ल्यासंदर्भात तपास यंत्रणांनी रश्दी यांची चौकशी केली असून त्यांनी जबानी दिल्याचेही सांगण्यात आले. मागील आठवडय़ात न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात त्यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.