Tarun Bharat

‘नो एंट्री 2’मध्ये समांथा

सलमान खानचा चित्रपट

सलमान खानचा ‘नो एंट्री 2’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आता दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. सलमानच्या या चित्रपटात 10 नायिका असणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘नो एंट्री में एंट्री’ ठेवण्यात आले असून यात सलमान खानसह अनिल कपूर आणि फरदीन खान दिसून येईल. तर नायिकांमध्ये समांथा रुथ प्रभू सामील असल्याचे समजते.

Advertisements

या चित्रपटात समांथा, रश्मिका मंदानासह पूजा हेगडे, तमन्ना भाटिया यांचा समावेश असेल अशी चर्चा आहे. परंतु या अभिनेत्रींबद्दल कुठल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

मूळ चित्रपटात दिसून आलेल्या बिपाशा बसू, लारा दत्ता, ईशा देओल आणि सेलिना जेटली या अनीस बझ्मी यांच्या ‘नो एंट्री में एंट्री’चा हिस्सा नसणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाची पटकथा पूर्ण झाली असून सलमान खानला ती आवडली असल्याचा दावा अनीस बझ्मी यांनी केला आहे.

Related Stories

कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

Rohan_P

अनुष्का शेट्टी आता ‘कू’वर

Amit Kulkarni

तू इथे जवळी राहा म्युझिक व्हिडिओत यशोमान आपटे, ज्ञानदा रामतीर्थकर

Patil_p

विशाल निकम ठरला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता

Sumit Tambekar

विदेशी भक्तांना पोस्टाद्वारे मिळते भस्म

Amit Kulkarni

3 वेगवेगळय़ा लुकमध्ये दिसणार तापसी

Patil_p
error: Content is protected !!