अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू दीर्घकाळापासून मायोसायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. समांथाने सोशल मीडिया पोस्टद्वारे याचा खुलासा केला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री रुग्णालयात दिसून येत असून तिच्या हातावर ग्लुकोज चढविण्याची स्ट्रीप लावलेली दिसून येत आहे. आपण लवकरच बरी होणार असल्याचे तिने नमूद केले ओ.
यशोदाच्या ट्रेलरला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाचप्रकारचे प्रेम आणि आत्मियता तुम्हा सर्वांकडून नेहमीच इच्छिते. यातूनच मला शक्ती मिळते आणि जीवनातील आव्हानांशी लढू शकते. काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस आजार झाला आहे. ही गोष्ट खूप आधीच सर्वांना सांगू इच्छित होते, परंतु हे सांगण्यास काही काळ लागल्याचे समांथाने म्हटले आहे.
नेहमीच ठामपणे उभे राहण्याची गरज नसते हे आता मला हळूहळू समजू लागले आहे. अनेकदा गंभीर स्थिती स्वीकारणेच योग्य असते. मी सध्या अशाच स्थितीला सामोरी जात आहे. या आजारातून लवकर पूर्ण बरी होणार असल्याचे डॉक्टरांचे मानणे आहे. माझ्या जीवनात चांगले दिवस आले आणि अनेक वाईट दिवसही आले आहेत. हा प्रकार शारीरिक स्वरुपात होता आणि भावनात्मक स्वरुपातही होता. हळूहळू बरी होण्याच्या स्थितीत मी असल्याचे जाणीव आता होतेय असे समांथाने सोशल मीडियावर म्हटले आहे.
समांथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा तिच्या कारकीर्दीतील पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. याचबरोबर अभिनेत्री पुढील वर्षी शांकुतलम या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच अरेंजमेंट ऑफ लव्ह या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत काम करत आहे.