सिटाडेल’च्या सेटवर लावली हजेरी
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने काही काळापूर्वी आपण ऑटो इम्यून कंडीशन मायोसिटिसशी झगडत असल्याचे आणि त्यावर उपचार घेत असल्याचे सांगितले होते. याकरता तिने कामातून ब्रेकही घेतला होता. समांथाच्या चाहत्यांसाठी आता खूशखबर आहे. अभिनेत्री चित्रिकरणाच्या सेटवर परतली आहे. तिने अभिनेता वरुण धवनसोबत स्वतःचा बहुचर्चित प्रोजेक्ट ‘सिटाडेल’वर काम सुरू केले आहे.


आजारपणामुळे समांथा या प्रोजेक्टमधून बाहेर पडू शकते अशी चर्चा होती, परंतु समांथाने आता चित्रिकरण सुरू करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चित्रिकरणापासून दीर्घ बेक घेतल्यावर समांथाने वरुण धवनसोबत सिटाडेल इंडियाचे चित्रिकरण सुरू केले आहे. चित्रिकरणाचे सत्र दोन आठवडे चालणार आहे. फिक्शन सीरिज ‘सिटाडेल’च्या रुसो ब्रदर्स इंडियन स्पिनऑफचा समांथा हिस्सा असल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी निर्माते तयार आहेत. काही आठवडय़पूर्वी वरुण धवनने समांथासोबत 4 दिवसांचे चित्रिकरण पूर्ण केले होते. यात काही हाय-ऑक्टेशन ऍक्शन दृश्ये चित्रित करण्यात आली होती.
द सिटाडेल-रुसो ब्रदर्स प्रोजेक्टमध्ये रिचर्ड मॅडेनला सिटाडेल एजंट मेसन केन आणि प्रियांका चोप्राला सिटाडेल एजंट नादिया सिंहच्या स्वरुपात दर्शविले जाणार आहे. सीरिजच्या भारतीय रुपांतराला द फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्याकडून दिग्दर्शित केले जात आहे.
समांथा याचबरोबर लवकरच ‘शांकुतलम’ चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. समांथा ‘सिटाडेल’चे चित्रिकरण पूर्ण केल्यावर विजय देवरकोंडासोबतच्या ‘कुशी’ चित्रपटाचे चित्रिकरण करणार आहे.