Tarun Bharat

समंथाने घेतले नागचैतन्यचे घर

Advertisements

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीची आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाणारी समंथा रुथप्रभू हिने नुकतेच हैद्राबाद येथे एक आलीशान घर घेतले आहे. पूर्वी या घराची मालकी तिचा एक्स पती नागचैतन्य यांच्याकडे होती. ती नागचैतन्यबरोबर राहात असताना या घराशी तिचे भावनिक संबंध जुळल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतरही तिने हे घर विकत घेतले.

त्यांचा बेकअप होत असताना नागचैतन्यने हे घर अन्य खरेदीदाराला विकले होते. तथापि, या घरातून बाहेर पडणे तिच्या जीवावर आले. त्यामुळे तिने त्या खरेदीदाराकडून हे घर पुन्हा विकत घेतले. यासाठी तिला 25 टक्के जास्त किंमत मोजावी लागली. तरीही तिने हा व्यवहार केला. आता ती या घरात आपल्या आईसह रहात आहे. तिचे चाहते तिच्या या कृतीचे कौतुक करीत आहेत. ते तिला सेल्फमेड आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची महिला म्हणून ओळखतात. मात्र, अनेक जणांनी तिला यासंदर्भात ट्रोलही केले आहे. तिने असे मोठे काय केले? असा प्रश्न त्यांना पडतो. एकंदर घरखरेदीचा हा व्यवहार तिला पुन्हा चर्चेत आणण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. कदाचित या प्रसिद्धीसाठीच तिने हा व्यवहार उघड केला असावा, असेही अनेक लोकांचे म्हणणे आहे.

Related Stories

सुशांतसिंह राजपूतचा ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट

Patil_p

‘निळ्या पीपीई किटच्या समुद्रामध्ये… ‘

Rohan_P

कॅटरिनाच्या ‘फोनभूत’चे पोस्टर सादर

Patil_p

शाहिदच्या चित्रपटात तृप्ती डिमरी

Patil_p

आदिनाथ कोठारेचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक

Patil_p

झोंबिंवर आधारित पहिला मराठी चित्रपट झोंबिवली

Patil_p
error: Content is protected !!