हॉलिवूडचे स्टटंमन करणार कोरियोग्राफ
अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने स्वतःचा आगामी चित्रपट यशोदा’च्या चित्रिकरणात भाग घेतला आहे. या चित्रपटात ती जबरस्दत आणि अत्यंत अवघड स्टंट करताना दिसून येणार आहे. या स्टंटसाठी अभिनेत्रीला हॉलिवूडच्या स्टंटमॅनकडून प्रशिक्षण मिळत असल्याचे समजते.
हॉलिवूडचे स्टंटमॅन यानिक बेन तिला प्रशिक्षण देत आहेत. यामुळे तिने यानिक बेन यांच्यासोबत ‘द फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिजमध्ये काम केले होते. यशोदा या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात समांथा मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटात समांथासोबत तमिळ अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार देखील दिसून येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन हरी-हरीश ही जोडी करत आहे. श्रीदेवी मूव्हीज या बॅनर अंतर्गत यशोदा या चित्रपटाची निर्मिती शिवलेंका कृष्ण प्रसाद करत आहेत. यशोदा हा बिग बजेट चित्रपट आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती पेझ पाहता निर्माते हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करणार आहेत. हा चित्रप तेलगू, तमिळ, मल्याळी, हिंदीसोबत कन्नडमध्येही प्रदर्शित होणार आहे.