दक्षिणेतील सुपरस्टार समांथा रुथ प्रभू लवकरच स्वतःचे बॉलिवूड पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीने आयुष्मान खुरानासोबतचा हिंदी चित्रपट स्वीकारला आहे. अभिनेत्रीला या चित्रपटाची कथा आवडली आहे. परंतु समांथाने अमेझॉन प्राइमची वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या सीझन 2 द्वारे स्वतःचे डिजिटल पदार्पण यापूर्वीच केले आहे. तेव्हापासून तिचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण वर्षाच्या अखेरीस सुरू होणार आहे. तर 2023 च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ड्रामा तसेच सस्पेन्सही दिसून येणार आहे. परंतु या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही. समांथाने याचबरोबर स्वतःचा दुसरा हिंदी चित्रपट स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट एक पौराणिक महाकाव्य असून त्याचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. समांथाने मॉडेल म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. अभिनेत्रीचे अनेक चित्रपट आतापर्यंत ब्लॉकबस्टर ठरले आहेत. समांथा ही दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री आहे.
Previous Articleगुजरातमध्ये काँग्रेसचे सोशल इंजिनियरिंग
Next Article महाराष्ट्र अलर्ट मोडवर…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.