Tarun Bharat

11 नोव्हेंबरला झळकणार समांथाचा ‘यशोदा’

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या  स्वतःचा आगामी चित्रपट ‘यशोदा’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात ती अत्यंत अनोखी भूमिका साकारणार आहे. तिचा हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हरि-हरिश ही जोडी करत असून त्यांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण असणार आहे.

श्रीदेवी मूव्हीज बॅनर अंतर्गत शिवलेंका कृष्ण प्रसाद हे ‘यशोदा’ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा बिगबजेट चित्रपट असून तो सायन्स फिक्शन थ्रिलर स्वरुपाचा असणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांकडून त्याला मोठी पसंती मिळाली आहे.

तमिळ भाषेत तयार झालेला हा चित्रपट हिंदी भाषिक पट्टय़ातील दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती क्रेझ पाहता निर्माता देशात सर्वत प्रदर्शित करणार आहेत. हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळी, हिंदीसह कन्नडमध्येही प्रदर्शित होणार आहे.समांथाचे आणखी दोन चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. 4 नोव्हेंबर रोजी तिचा ‘शांकुतलम’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘शांकुतलम’मध्ये समांथासोबत अभिनेता देव मोहन हा दुष्यंताच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

Related Stories

म्युझिक अल्बम मधून स्वाती हनमघर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण!

Tousif Mujawar

रविना टंडनच्या मुलीला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट

Amit Kulkarni

राधे, 83, सूर्यवंशीच्या प्रदर्शनात हिस्सेदारीचा अडथळा

Amit Kulkarni

बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन

tarunbharat

जयललितांच्या घराचे स्मारकात रूपांतर

Amit Kulkarni

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतचा आजपर्यंतचा फिल्मी प्रवास फक्त एका क्लिकवर

Archana Banage