क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बलराम स्पोर्ट्स आयोजित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजू काणकोणकर पुरस्कृत 31 व्या बलराम चषक क्रॉस कंट्री (मिनी मॅरेथॉन) स्पर्धेत अथर्व देसाई, समर्थ कदम, समर्थ पाटील, दीप्ती भवानी, साक्षी नेसरकर, स्नेहल नाईक यानी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. बलराम स्पोर्ट्स आयोजित 26 जानेवारी प्रजसत्काक दिनानिमित्त या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन बलराम स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. जवळपास विविध गटातून 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे – खुला गट पुरूष विभाग 1) समर्थ कदम 2) हर्ष अनिल गोरे, 3) श्रीहरी पटान, 4) शाहीश कदम, 5) सुहास पाटील. महिला विभाग -1) सानिका नाईक, 2) प्राची भवानी, 3) वैशाली नांदगेर, 4) प्रियांका भवानी, 5) वैष्णवी भवानी. 5 वी ते 7 वी गट – मुले – 1) अथर्व देसाई, 2) समर्थ गवळी, 3) ज्युवेल कार्लि, 4) सोहम दवले, 5) प्रितेश दवले. मुली – साक्षी नार्वेकर, 2) स्नेहा मोरे, 3) संध्या नाईक, 4) श्रुष्टी भवानी. 1 ली ते 4थी विभाग- मुले – समर्थ पाटील, 2) श्रेयस निलजकर, 3) जयेश गोरे, 4) सुशिलकुमार पाटील, 5) मंथन ढवळे. मुली – 1) स्नेहल नाईक, श्रुष्टी भवनी, संस्कृती भवानी, लतिका भवानी, 5) लावण्य भवानी व सौम्या गवळी. उत्तेजनार्थ दिप्ती भवानी, अथर्व ढवळे, सौम्या ढवळे, जया गवळी यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे अनिल गोरे, सुजाता गवळी, मऱ्याप्पा पाटील, शेखर पाटील व अॅङ धनराज गवळी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अॅङ रोहन गवळी, अभिषेक गवळी, राहुल गवळी, भगतसिंग गवळी, साहील गवळी, पूजा गवळी, हर्षा गवळी, रष्मी गवळी, यांनी विशेष परिश्रम घेतले.