ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Samata Party claims ‘Mashal’ symbol दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने ‘मशाल’ चिन्हावर दावा केला असून, अंधेरीतील पोटनिवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे या चिन्हावरुन ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यासंदर्भात बोलताना म्हणाले, 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पार्टीची स्थापना केली होती. 1996 मध्ये या पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले. 2004 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द करताना हे चिन्ह खुले केले होते. त्यामुळे ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले.
अधिक वाचा : पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बेमुदत उपोषण
पण समता पार्टीच्या झेंडय़ात मशाल आहे. त्याच्या मधल्या पट्टयात पांढरा रंग तर वरच्या आणि खालच्या बाजूस हिरवा रंग आहे. निवडणूक मतदान यंत्रावर ब्लॅक आणि व्हाईट रंगात चिन्ह असते. एकाच वेळी दोन उमेदवार मशाल चिन्हासह उभे राहिल्यास मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही हे चिन्ह समता पार्टीला मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवला आहे. मशाल चिन्हातील साम्यामुळे मतविभागणीची शक्यता जास्त आहे, असेही देवळेकर म्हणाले.