Tarun Bharat

गुणरत्न सदावर्तेंवर सोलापुरात शाईफेक

ऑनलाईन टीम/तरुण भारत

वकील गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratan Sadavarte) यांच्या अंगावर आज सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करत राडा केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सोमनाथ राऊत असं शाईफेक करणाऱ्याचं नाव आहे. सोमनाथ राऊत सोलापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. तर या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही असं सदावर्ते म्हणाले. तर याविषयी सोमनाथ राऊत यांनी विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. यावेळी ते म्हणाले, संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली. ही काळी शाई छत्रपतींच्या प्रतिमेवरही पडली. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी काल उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांना विरोध झाला होता. आज सोलापूरमध्ये (Solapur) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करत त्यांची पत्रकार परिषद उधळवून लावली आहे.

हे ही वाचा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

काय म्हणाले सोमनाथ राऊत
“आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.”

“आम्ही सदावर्तेंच्या अंगावर काळी शाई फेकली आणि काळे कापड दाखवून निषेध केला आहे. ते महाराष्ट्राकडे अशाच वाकडे नजरेने पाहत असतील त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपचं पिल्लू आहे. भाजपाने महाराष्ट्र तोडायचा ठरवलं आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड जळवळ जीवंत आहे हे आम्ही भाजपचं पिल्लू सदावर्तेंना सांगू इच्छितो,” असं मत सोमनाथ राऊत यांनी व्यक्त केलं.

Related Stories

आमदार गीता जैन शिवसेनेत, मातोश्रीवर पार पडला पक्षप्रवेश

Tousif Mujawar

पोहाळेत झाड उपटल्याचा वाद ; एकजण जखमी

Abhijeet Khandekar

विधवा वहिनीशी विवाह करून रुजवला पुरोगामी विचार

Abhijeet Khandekar

मुंबईत डी कंपनीशी संबंधित 20 ठिकाणांवर NIA ची छापेमारी

datta jadhav

झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Patil_p

सांगरुळच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सातारचा फैय्याज शेख “छत्रपती श्री ” चा मानकरी

Abhijeet Khandekar