Tarun Bharat

Sambhaji Raje: 9 ऑगस्टला तुळजापूरातून होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात;संभाजीराजेंची घोषणा

राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा अॅक्टीव्ह झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आता पुन्हा त्यांनी क्रांतीची मशाल हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे. (Parivartan Kranti By Sambhaji Raje Chhatrapati)

ट्वीटमध्ये ते म्हणतात, ”क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात.. भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे क्रांती दिनाचं (Kranti Din) औचित्य साधून महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात ही तुळजापूरपासून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीतून माघार घेवून संभाजीराजेंनी ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असंही संभाजीराजे म्हणाले होते.

महाराष्ट्रा परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरातूनच का?

काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे येथील जनता आक्रमक झाली होती.या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे क्रांती दिनीचे औचित्य साधून तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

ग्रंथ हे जगण्याची भाकरी देतात

Patil_p

बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात पूर्ण करणं शक्य : शरद पवार

prashant_c

सृष्टी पाटील वक्तृत्व आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Archana Banage

दडपशाहीमुळे मराठा समाज झुकणार नाही

Archana Banage

बळीराजाच्या दसऱ्याला ‘प्रोत्साहन’ची गोडी

Archana Banage

वेळेपूर्वी दुकाने उघडी ठेवणाऱया चौघांवर गुन्हा

Patil_p