Tarun Bharat

मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर एवढं घडलं नसतं – संभाजीराजे छत्रपती

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती. एवढं सगळं प्रकरण घडलं नसतं”, असं म्हणत संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून ४६ हुन अधिक आमदार सोबत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. पण जर मला शिवसेनेने उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती, असं सूचक वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. मंत्री एकनाथ मंत्री यांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

मागील २ वर्षांपासूनच एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मी सुद्धा बघतोय, काय निर्णय येतो बघू, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

ज्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण गेलं, त्यावेळी बऱ्याच लोकांना वाटत होतं की, महाराष्ट्रात दंगल व्हावी. पण मी समाजाचं हित पाहिलं, मी कुणाच्या बरोबर आहे हे न बघता त्या स्टेजवर गेलो आणि समाजाला शांत केलं. मी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले आहे आणि बहुजन समाजाच्या हितासाठी काम केलं, असं संभाजीराजे म्हणाले.

Related Stories

‘संजय राऊत मातोश्रीचे तर वडेट्टीवार सोनिया गांधींकडे घरगडी’, भाजप आमदाराची बोचरी टीका

Abhijeet Shinde

तरुण भारत सांगली आवृत्ती वर्धापन दिन विशेषांकाचे शानदार प्रकाशन

Abhijeet Shinde

अंत्यसंस्कारासाठी दहा हजाराची मागणी

Patil_p

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

Rohan_P

उदयनराजेंनी घेतली किरीट सोमय्यांची भेट

Patil_p

सांगली जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!