ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje cchatrapati) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेनेनं दोन जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेत (shivsena) प्रवेश करावा अशी अटही शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना घालण्यात आली होती मात्र संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश न करता स्वराज्य ही संघटना स्थापन करणार असल्याचे सांगितल्याने संभाजीराजे यांच्या समोरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते त्यामुळे आता संभाजीराजे काय भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आता शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत संभाजीराजे यांच्याकडे शिवसेनेचे एक शिष्टमंडळ पाठवले असून या शिष्टमंडळाची ट्रायडंट हॉटेलमध्ये संभाजीराजेंसोबत बैठक सुरु आहे. त्यामुळे संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असणार अशा चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संभाजीराजे यांचा मुक्काम सध्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई (anil desai), उदय सामंत (uday samant) आणि मिलिंद नार्वेकर (milind narvekar) या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. तर संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये सेनेने घातलेली अट राजेंना मान्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बैठक संपल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती आहे