Tarun Bharat

संभाजीराजेंची संघटना आक्रमक; पुण्यात कोश्यारींना दाखवले काळे झेंडे

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

swarajya sanghtna aggressive; Black flags shown to Governer in Pune छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील पाषाण परिसरात कोश्यारींना काळे झेंडे दाखवले. यावेळी बंदोबस्तातील पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही संतप्त कार्यकर्त्यांनी ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’ अशी घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध नोंदवला.

राज्यपाल कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत. वेगवेगळय़ा कार्यक्रमांना ते आज हजेरी लावणार आहेत. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. राज्यपालांच्या पुणे दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. पाषाण येथील अभिमान सोसायटीजवळ कोश्यारींना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

अधिक वाचा : दक्षिण, मध्य, वायव्य भारतात थंडी जास्त

राज्यपालांचे पुण्यातील सगळे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न स्वराज्य संस्थेकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यपालांच्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी तसेच राजभवानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ जवळील टोल नाका रद्द करा; राष्ट्रवादीची मागणी

Archana Banage

अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Tousif Mujawar

फडणवीस पुढील 25 वर्ष वैफल्यग्रस्तच राहतील

datta jadhav

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

Tousif Mujawar

सरकार पाडण्यासाठी अनेकजण मनात गुढ्या उभारतायत, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Archana Banage

धवन सेनेचे लक्ष मालिका विजयावर

Patil_p