Tarun Bharat

संभाजीराजेंसाठी मराठा क्रांती मोर्चा मैदानात

राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्याचे सर्व पक्षांना आवाहन : शिवसेनेची संभाजीराजेंना सोमवारची डेडलाईन : शिवबंधन बांधा अन्यथा दुसऱ्या उमेदवाराला संधी

प्रतिनिधी/मुंबई, कोल्हापूर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेनेने ऑफर दिल्यानंतरही संभाजीराचे अद्यापही अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा संभाजीराजेंसाठी मैदानात उतरला आहे. सर्व पक्षांनी विना अट संभाजीराजे यांना बिनविरोध, विनाअट राज्यसभेवर निवडून देवून राज्यात वेगळा पायंडा पाडावा, असे आवाहन सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महाआघाडीसह विरोधी भाजपच्या नेत्यांना केले आहे.

दरम्यान, शनिवारी दिवसभर राजकीय घडामोडी घडल्या. संभाजीराजे (sambhajiraje chhatrapati)यांना सोमवार पर्यंत ऑफरबाबत निर्णय कळविण्याची डेडलाईन देण्यात आलीं असून त्यानंतर शिवसेना आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. शिवसेनेकडून संजय राऊत राज्यसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चा मैदानात
संभाजीराजे यांना सर्व पक्षांनी विनाअट राज्यसभेवर निवडून द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे (akhil bhartiya maratha mahasangh) राष्ट्रीय अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे (maratha kranti morcha) राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी इंदापूर येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात शाहूंच्या वारसाला बिनविरोध राज्यसभेवर जाण्याची संधी दिल्यास राज्यात चांगला संदेश जाईल, यासाठी भाजपने संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठबळ द्यावे, अशी विनंती यांनी फडणवीस यांना केली. त्यावर फडणवीस यांनी भाजप सकारात्मक असल्याचे संकेत दिले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे येथील राज्य समन्वयकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेने संभाजीराजेंच्या उमेदवारीला विनाअट पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली अपक्ष आमदारांची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीला राज्यमंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडे, किशोर जोरगेवार, विनोद आग्रवाल, मंजुळा गावित, गीता जैन आदी उपस्थित होते. बैठकीत बहुतांश आमदारांनी राज्यसभेसाठी पक्षाबाहेरील उमेदवारासह संधी देण्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांना संधी देण्यात यावी, असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही माजी खासदारांच्या नावाची चर्चाही या बैठकीत झाल्याची माहिती पुढे आली आहे.

संभाजीराजेंना सोमवारपर्यंतची डेडलाईन
संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, शिवसेनेच्या उमेदवारीवर राज्यसभा निवडणूक लढावावी, अशी आŸफर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यावर संभाजीराजेंनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दरम्यान, शिवसेनेने संभाजीराजे यांचा निर्णय सोमवारपर्यत झाला नाही, तर इतरांना संधी देण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. ऐनवेळी चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संभाजीराजेंच्या निर्णयाकडे साऱयांच्या नजरा आल्या आहेत.

राज्यसभेत जायचे असे तर संभाजी राजे यांनी शिवसेनेत यावे : संजय राऊत
छत्रपती संभाजी राजेना राज्यसभेत जायचे असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. सहावी जागा शिवसेनेची आहे. संभाजीराजेंसाठी शिवसेना ही जागा सोडणार नाही. मात्र राजेंना राज्यसभेवर जायचे असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांची शनिवारी भेट घेऊन चर्चा केली. त्यात राज्यसभेविषयी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगताता त्यांनी राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारच्या राजकीय घडामोडी आणि विधाने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-संजय राऊत चर्चा
सहावी जागा शिवसेना सोडणार नाही : राऊत
संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे तरच उमेदवारी : राऊत
शिवसेना नेत्यांना राज्यसभेवर संधी द्या : अपक्ष आमदार
संभाजीराजेंना भाजपने पाठिंबा द्यावा : राजेंद्र केंढरे
चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा
सोमवारपर्यंत राजेंचा निर्णय न आल्यास इतरांना संधी : शिवसेना

Related Stories

अविवाहित शेतकरी तरूणांना 10 लाख सानग्रह अनुदान द्या

Abhijeet Khandekar

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

Kalyani Amanagi

President Draupadi Murmu : राष्ट्रपतींवर केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते उदित राज अडचणीत

Abhijeet Khandekar

खेड तालुक्यात घरांवर दरड कोसळल्याने १७ जण अडकले; बचावकार्य सुरु

Archana Banage

भाजपविरोधात उद्या ‘माफी मांगो’ आंदोलन

datta jadhav

नवीन प्लॅटफॉर्मचे काम पुढे सरकेना; मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत शंका

Abhijeet Khandekar