दीपक केसरकर पर्यटनमंत्री व्हावे असा आमचा आग्रह-संभाजीराजे
Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: महाराष्ट्राचे वैभव जगासमोर टिकलं पाहिजे. पर्यटनामध्ये किती ताकद असते हे इंग्लंड, फ्रान्स या देशातून दिसून येते. आपल्या राज्यातील पर्यटनस्थळांचा विकास गरजेचा आहे. आपला गौरवशाली इतिहास जगापुढे नेऊया.आज संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट झाली. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी एक दिशा मिळाली आहे. असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. आज उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पुण्यात केसरकरांची भेट घेतली. यावेळी पर्यटन स्थळासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे केसरकरांना सांगितले. दोन्ही राजांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पर्यटना संदर्भात होत असणाऱ्या चर्चेमुळे दीपक केसरकरांना पर्यटन खातं मिळण्याचे पुन्हा संकेत मिळाले आहेत.
माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, जनतेला स्वप्न दाखवून केवळ आश्वासनं देणार नाही, ती पूर्ण करणार . याचबरोबर मराठा आरक्षणीप्रश्नी मुंबई पेटली असती. केवळ संभाजीराजेंच्या आवाहनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. अशी आठवण करून देत संभाजीराजेंचे कौतुक केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत लवकरच बैठक बोलावणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसैनिकांना बाजूला सारून शिवसेना होऊ शकत नाही.
दीपक केसरकर पर्यटनमंत्री व्हावे असा आमचा आग्रह आहे असे संभाजीराजे म्हणाले.