Tarun Bharat

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवारांना (sanjay pavar) पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या या पराभवावर आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर (shivsena) जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा आव आणणाऱ्यांची लगेचच फजिती होते, अशा अर्थाचं तुकोबांचा एक अभंग ट्विट करत संभाजीराजेंनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll’ तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll अशा ट्विट करत संभाजीराजेंनी केलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा ६ वा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घालण्यात आली होती. यांनतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणत स्वाभिमान राखण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत.

पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती हे आता निकालांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.

Related Stories

टोमॅटो चे दर गगनाला! का महागले टोमॅटो वाचा सविस्तर….

Archana Banage

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी 20 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!

Tousif Mujawar

गतवर्षीचा अनुभव घेत आठ दिवसांत एसओपी तयार करा :पालकमंत्री सतेज पाटील

Archana Banage

समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या

Tousif Mujawar

चाकूने भोसकलेल्या युवकाचा मृत्यू

Patil_p