ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Same-sex marriage bill passed in America समलिंगी विवाहाला संरक्षण देणारे विधेयक अमेरिकन सिनेटने मंगळवारी मंजूर केले. या विधेयकामुळे समलिंगी जोडप्यांना फेडरल संरक्षण मिळणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केलं आहे.
समलैंगिकता ही अमेरिकेत अनेक दशकांपासून मोठी समस्या आहे. समलिंगी विवाह विधेयक सिनेटमध्ये मंजूर करण्यासाठी डेमोक्रॅट्सना खूप संघर्ष करावा लागला. 100 सदस्यीय सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सच्या 50 जागा आहेत आणि ते मंजूर करण्यासाठी त्यांना किमान 10 रिपब्लिकन मतांची आवश्यकता होती. या विधेयकाच्या बाजूने 61 तर विरोधात 36 मते पडली. सिनेटमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर ते पुन्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जाणार आहे.
अधिक वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन ट्रकचा भीषण अपघात; 100 फूट दरीत कोसळला ट्रक
दरम्यान, जो बायडेन यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रेम हे प्रेम असतं आणि अमेरिकन लोकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार असावा. यूएस सिनेटनं मंजूर केलेलं विधेयक समलैंगिक विवाहास फेडरल मान्यता संरक्षित करेल. 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरात त्यावर बंदी घातली होती. पण आता हे विधेयक सुनिश्चित करेल की, समलैंगिक आणि आंतरजातीय विवाह यूएस फेडरल कायद्यात समाविष्ट आहे.
दरम्यान, मंजूर विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हकडे पाठविण्यात येणार आहे. सभागृह त्याला मंजुरी देईल आणि त्यानंतर हे विधेयक स्वाक्षरीसाठी जो बायडेन यांच्याकडे जाणार आहे.