Tarun Bharat

दिल्ली मद्य धोरण घोटाळय़ात समीर महेंद्रूला ईडीकडून अटक

Advertisements

नवी दिल्ली

 दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळय़ाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मद्यसम्राट समीर महेंद्रूला अटक केली. याआधी मंगळवारी सीबीआयने व्यापारी विजय नायरला अटक केली होती. दारू घोटाळय़ाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 16 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील मद्य धोरणामध्ये (एक्साईज पॉलिसी) गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सीबीआयने गेल्या महिन्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते. या छाप्यांनंतर या घोटाळय़ाशी संबंधित असलेले अन्य काही जण रडारवर आले होते. याप्रकरणी दिल्लीतील मद्य धोरणाविरोधात सीबीआयने 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नावही समाविष्ट आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाविरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. त्यानुसार तपास यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. तपासादरम्यान सीबीआयच्या पथकाने उत्पादन शुल्क उपायुक्त असलेले आनंद तिवारी, तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, कुलजीत सिंग, सुभाष रंजन यांच्या घरांवरही छापे टाकले. सीबीआयने मद्य धोरण घोटाळय़ाच्या आरोपासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काही दारू कंपन्यांचाही समावेश आहे. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Related Stories

सांबामध्ये संशयित ड्रोनच्या घिरट्या

datta jadhav

दहशतवाद्याचा खात्मा; जवानही हुतात्मा

Patil_p

अतिवृष्टी अगर नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तात्काळ करावेत : संजय भागवत

Patil_p

उत्तराखंडमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 2800 वर

Tousif Mujawar

देशात 21 हजार 822 नव्या बाधितांची नोंद

Patil_p

बैसाखी : पहिल्यांदाच सर्वत्र शुकशुकाट

Patil_p
error: Content is protected !!