Tarun Bharat

म्हैसाळ घटनेमागील आरोपीवर कठोर कारवाईसाठी गृह विभागाकडे पाठपुरावा करणार- केद्रींय मंत्री रामदास आठवले

Advertisements

सांगली : प्रतिनिधी

म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे यांच्या परीवाराने विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या केली ही बाब गंभीर असून या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रह विभागाला करणार असल्याचे केद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्यांनी म्हैसाळ येथे सामुहिक आत्महत्या केलेल्या वनमोरे कुंटुबांची भेट घेऊन सात्वंन केले. त्यावेळी शोकसभेत ते बोलत होते. त्यांनी घटनास्थळांळाची पाहणी केली. या संपूर्ण घटनेची माहिती सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेंडाम व मिरजेचे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक विरकर यांनी रामदास आठवले यांना दिली.

शोकसभेत बोलताना रामदास आठवले म्हणाले…म्हैसाळ गावामध्ये खाजगी सावकारी वाढली आहे. वनमोरे कुंटुबीयांनी कष्टातून संसार उभा केला होता. या आत्महत्याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे यांचा तपास पोलीस करत आहेत. वनमोरे कुटुंबीयांनी ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांची नावे सुसाईड नोट मध्ये पोलीसांना मिळून आली आहेत. पोलीसांनी सुसाईड नोट सापडल्याची चर्चा न करता त्या आरोपींना पकडले आहे. माझ्या विभागाच्या वतीने जितकी मदत करता येईल ती वनमोरे कुटुंबीयाना करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Related Stories

सांगली : पालकमंत्र्यांच्या मिरज तालुक्यात पूरपरिस्थिती पाहणी दौरा

Abhijeet Shinde

सांगलीवाडी, कृष्णा घाटावर रेस्क्यू टीम तैनात

Abhijeet Shinde

भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील सोळा गावातील व्यापाऱ्यांची बैठक; ८ ते १२ दुकाने राहणार सुरू

Abhijeet Shinde

Sangli Political : आज आरक्षण सोडत, इच्छुकांची उत्कंठा शिगेला

Abhijeet Khandekar

महाव्यवस्थापकांचा दौरा ‘बुलेट ट्रेन’पेक्षा फास्ट!

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये घरफोडी : ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

Sumit Tambekar
error: Content is protected !!