Tarun Bharat

कोल्हापूरचे सम्मेद, मंदार लाड बुद्धिबळ स्पर्धेत विजेते

Advertisements

बीडीसीए बुद्धिबळ स्पर्धा : महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंची चमक

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा संघटना आयोजित खुल्या व वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सम्मेद शेटय़ेने प्रथम क्रमांक पटकाविला. विविध गटात मंदार लाड, साई मंगनायक, ईश्वरी जगदाळे, अथर्व मुंगरवाडी, निधी कदम, दिव्येश तालिमनी यांनी विजेतेपद पटकाविले. खुल्या गटात महाराष्ट्राच्या बुद्धिबळपटूंनी चमक दाखविली.

संत मीरा स्कूलच्या सभागृहात चेकमेट चेस व बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत खुल्या गटात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत संमेद जयकुमार शेटय़े कोल्हापूर 8.5 गुणांसह पहिला, साईराज भोसले कोल्हापूर 8 गुणांसह दुसरा, मंदार प्रदीप लाड गोवा 7.5 गुणांसह तिसरा, अभिषेक गांगेर बेळगाव 7.5 गुणासह चौथा, चैतन्य एम. डी. बेळगाव 7 गुणासह पाचवा, दत्तात्रेय राव दासारी बेळगाव 7 गुणांसह सहावा, सोहम खासबरदार कोल्हापूर 7 गुणांसह सातवा, अनिकेत बापट सातारा 7 गुणांसह आठवा, ईश्वरी जगदाळे सांगली 7 गुणांसह नववी, आदित्य सावलकर कोल्हापूर 6.5 गुणांसह दहावा क्रमांक पटकाविला तर श्रीहरी देशपांडे बेळगाव, रविंद्र निकम इचलकरंजी, दिव्या पाटील कोल्हापूर, नितीश भट बेळगाव, तेजस्वी एन. चित्रदुर्ग, अजित एम. पी. बेळगाव, यश उपाध्ये गोवा, मुदस्सर पटेल मिरज, राशी खान बेळगाव, सोहम चिखले सांगली यांनी अनुक्रमे 11 ते 20 वे क्रमांक पटकाविले.

18 वर्षावरील उत्कृष्ट महिला गटात अंबिका मासगी धारवाड, रेखा पावटे बेळगाव, उत्कृष्ट वयस्कर खेळाडू (55 वर्षावरील) सदानंद बाचिकर, प्रकाश कुलकर्णी, बेस्ट बेळगाव श्रेयस कुलकर्णी, श्रीप्रसाद कोकाटे दोघेही बेळगाव यांना गौरविण्यात आले. 8 वर्षाखालील गटात अवनीत नंदीकर, तन्मय पावले, हर्षवर्धन जाधव, दिव्येश तालीमनी, सिद्धांत थाबाज, अथर्व एम., वेदांत थाबाज, श्रेया बांदोडकर, अरवी पडके, राजवीर बाचीकर सर्व बेळगाव यांनी अनुक्रमे 1 ते 8 क्रमांक पटकाविले.

17 वर्षाखालील गटात मंदार लाड प्रथम, साईराज वेर्णेकर दुसरा, श्रीकरा दर्बा तिसरी, दिशा पाटील चौथी, सारंग पाटील पाचवा, आदित्य सावलकर सहावा, दिव्या पाटील सातवी, श्रीहरी देशपांडे आठवा, आदित्य करमोडी नववा, अनुज अजितकुमार कोली दहावा क्रमांक तर रीष खान, शर्वरी कबनूरकर, ऋषीकेश कबनूरकर, आदित्य कोळी, आयुष पाटील, प्रणव गुणकी, अखिलेश कामत, शंतनू पाटील, साईप्रसाद कोकाटे, अनिरूद्ध दासरी यांनी अनुक्रमे 11 ते 20 वे क्रमांक पटकाविले. 9 वर्षाखालील गटात मुले-रियार्थ पोतदार, आर्यवरत नाईक, अद्वीक फडके, यश कलाल, विवन सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात-तन्मयी पावले, म्युरल फर्नांडिस, अनुष्का बिरादार, अरूषा मोहंती, औरा फडके यांनी विजेतेपद पटकाविले.

संत मीराच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, निलेश भंडारी, डी. डी.राव, दीपक वायचळ, पवन शालगार, दीपक कदम, करण पाटील व मगदूम यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले.

Related Stories

शनिवारी पावसाच्या दमदार सरी

Patil_p

बांगरपेट तालुक्यातील तहसीलदारांचा निवृत्त मुख्याध्यापकाकडून खून

Abhijeet Shinde

कृष्णा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

Amit Kulkarni

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Omkar B

गांधी चौकातील रस्ता कधी खुला होणार?

Amit Kulkarni

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पीएफआयचा रास्तारोको

Omkar B
error: Content is protected !!