Tarun Bharat

संपतराव पवार ‘महाराष्ट्र जल सन्मान’ पुरस्काराने सन्मानित

आळसंद प्रतिनिधी
बलवडी भा ( ता.खानापूर ) येथील सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना महाराष्ट्र पाणी समिती यांच्या तर्फे ‘ महाराष्ट्र जल सन्मान’ पुरस्काराने जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पवार हे चार दशकांहून अधिक काळ पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. बळिराजा स्मृती धरण , अग्रणीनदी पुनरुज्जीवन , तीळगंगानदीवरील टायर बंधारा , हिवतडमध्ये कमी पाण्यात डाळिंब प्रकल्प,दुष्काळ निवारणासाठी लोकसहभागातून केलेला चारा प्रकल्प हे कार्य लोकाभिमुख ठरले आहे. यासर्व बाबींचा विचार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त उज्जलकुमार चव्हाण, शांतीलाल मुथा , पर्यावरण तज्ञ मयांक गांधी ,रुसेन कुमार , नरेंद्र चुग , विनोद बोधनकर , अंकुश नारायणकर, धर्मेंद्र पवार , अनिकेत लोहिया, सुभाष सुर्यवंशी , निकिता देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सांगली जिल्ह्यात १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन – पालकमंत्री

Archana Banage

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित

Archana Banage

सांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सांगली : काकाचीवाडी येथील युवकाचा विजेच्या धक्याने मृत्यू

Archana Banage

सांगली शहरात नवे ४४ रुग्ण

Archana Banage

जिल्ह्यात आतापर्यंत ५७० कोटींचा जीएसटी महसूल जमा

Archana Banage