प्रतिनिधी /पणजी
सम्राट स्टुडंड फाऊंडेशन व सम्राट क्लब कळंगूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सम्राट विद्यार्थी दिन कार्यक्रमात सेंट तेरेसा हायस्कूल कांदोळीच्या तेजस गुरूनाथ शिरोडकर याला सम्राट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक नागेश सरदेसाई व स्टुडंट फाऊंडेशनचे प्रतिनिधी म्हणून सम्राट क्लब अस्नोडाचे माजी अध्यक्ष महेश अस्नोडकर, सम्राट क्लब कळंगूटचे अध्यक्ष किरण पालकर, सम्राट स्टुडंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जयराम पेडणेकर, सचिव भालचंद्र नाईक उपस्थित होते.
सम्राट विद्यार्थी दिन एकाच दिवशी 16 विविध केंद्रावर साजरा करण्यात आला. यात सुमारे 417 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मागील 21 वर्षात 4200हून जास्त विद्यार्थ्यांना ‘उद्याचे आदर्श नागरिक’ म्हणून गौरविण्यात आले.