Samriddhi Mane’s resounding success in district level school judo competition
शालेय जूडो जिल्हास्तरीय ३६ कीलो वजनी गटाच्या स्पर्धेत समृद्धी देवेंद्र माने हीला घवघवीत यश मिळाले असून तिचा या स्पर्धेत व्दितीय क्रमांक आला आहे. समृद्धी माने ही दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल,डेगवे मध्ये इयत्ता सहावी इयत्तेत शिकत आहे.
या खेळाची तालुकास्तरीय स्पर्धा बांदा येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत तीची जिल्हा स्तरावर निवड झाली होती. जिद्द व चिकाटीच्या जोरावर समृद्धी माने हीने पुन्हा जिल्हा स्तरावर यश मिळवत आपले नाव कोरले. तिच्या या यशात तिचे वडील देंवेद्र माने व आई, शिक्षक यांचे सहकार्य मिळाले असल्याचे समृद्धी हीने सांगितले. तिच्या या यशाबद्दल दिव्य ज्योती स्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्रतिनिधी
बांदा