ऑनलाईन टीम/तरुण भारत
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून १ कामगार ठार तर २ कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उद्घाटनापूर्वीच हा अपघात (accident) झाल्याने पहिल्या टप्प्याचा उद्धाटन सोहळा पुढे ढकलल्याची माहिती आहे.
दरम्यान, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून १ कामगार ठार तर २ कामगार जखमी झाले आहेत. उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री ३ वाजता हा अपघात झाला आहे. नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळली आहे. त्यामुळे या महामार्गावरील २१० किमीच्या पहिल्या टप्प्याचा उद्धाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाला (samruddhi mahamarg) एकूण १०५ कमानी आहेत. त्यापैकी मोठी असलेली 16 व्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळला पुढे ढकलावं लागलं आहे. या अपघातातील मृत मजूर बिहारचा असल्याची माहिती समजत आहे.