वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण कोरियन कंपनीचा सॅमसंग गॅलेक्सी एस 14 स्मार्टफोन मार्च महिन्यामध्ये लॉन्च केला जाणार असून यासंदर्भातील तारीखही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरचा नवा स्मार्टफोन 24 मार्च रोजी भारतीय बाजारामध्ये दाखल केला जाणार आहे.
यासंदर्भातली माहिती कंपनीच्या अधिकृत स्थळावरती नुकतीच प्रकाशित करण्यात आली होती. अलीकडेच कंपनीने गॅलेक्सी ए 54 5जी आणि ए 34 या स्मार्टफोनचे लाँचिंग केले होते. याचाच अर्थ आगामी काळामध्ये कंपनी आपले नवनवे स्मार्टफोन टप्प्याटप्प्याने सादर करणार असल्याचे स्पष्ट होते आहे. कंपनीने मागच्या वर्षी दाखल केलेल्या एफ 13 प्रमाणेच सदरचा नवा स्मार्टफोन असणार असल्याचे सांगण्यात येत असून व्या फोनमध्ये काही बदलही असण्याची शक्मयता आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत 10 ते 15 हजार रुपये असेल असेही बोलले जात आहे. 5एनएम चीपसेट यात असणार असून हा 4 आणि 6 जीबी रॅमसह लाँच केला जाणार आहे. युआय 5.0 वर आधारित अँड्रॉइड 13 हे या स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर असणार आहे. चार वर्षाच्या सुरक्षा कवचासह हे सॉफ्टवेअर सादर केले आहे. 6.6 इंचाचा 1080 पी डिस्प्ले तोही वॉटरड्रॉप स्टाईल नॉच आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 5 संरक्षणासह येणार आहे. 6000 एमएएचची दमदार बॅटरी याला देण्यात आली असून सदरचा फोन हा दोन दिवस वापरता येणार आहे. 25 डब्ल्यूचा फास्ट चार्जर याला देण्यात आला आहे. सॅमसंग डॉटकॉम, फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल आउटलेट्सवर लवकरच हा फोन विक्रीकरता उपलब्ध केला जाणार आहे.