नवी दिल्ली : सॅमसंग कंपनीने भारतामध्ये आपला नवा क्रिस्टल 4 के नियो टीव्ही नुकताच लाँच केला आहे. डॉल्बी डिजीटल प्लस आणि ऍडेप्टीव्ह साऊंड टेक्नॉलॉजीसह सदरचा टीव्ही येणार आहे. 43 इंचाच्या टीव्हीसाठी ग्राहकांना 35 हजार 990 रुपये भरावे लागणार आहेत. सॅमसंग इंडियाचे ऑनलाईन व्यवसाय, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे वरि÷ संचालक संदीपसिंग यांनी क्रिस्टल 4 के नियो टीव्ही तंत्रज्ञानासह तसेच आकर्षक डिझाईनसह सादर करण्यात आला असून नवा टीव्ही ग्राहकांची पसंती नक्कीच प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


previous post
next post