वृत्तसंस्था/ मुंबई
सॅमसंग या कंपनीचे दोन नवे फोन येणाऱया काळामध्ये भारतीय बाजारामध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये गॅलेक्सी ए-53 आणि गॅलेक्सी ए-33 यांचा समावेश असणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मागच्या वषी हे दोन्ही फोन जागतिक स्तरावरती कंपनीने लाँच केले होते. भारतामध्ये मात्र सदरचे नवे फोन 16 मार्चला लाँच केले जाणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली आहे.
सॅमसंग इंडियाच्या संकेतस्थळावर वरील नव्या दोन स्मार्टफोनबाबत माहिती प्रसारित करण्यात आली आहे. निळय़ा आणि लिंबू रंगाच्या श्रीमंती थाट मिरविणाऱया डिझाईनसह सॅमसंगचे नवे दोन स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत.


ही असतील वैशिष्टय़े
गॅलेक्सी ए-53 याला 6.5 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले स्क्रीन असणार असून 32 मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. तर ए-33 या स्मार्टफोनला 6.4 इंचाची 1080 पी सुपर अमोलेड स्क्रीन असणार आहे. याला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार असल्याचे सांगितले जात आहे. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह येणारे हे फोन 5000 एमएएच बॅटरीसोबत येतील. 25 वॅटचा चार्जरही याला असणार आहे.