Tarun Bharat

Sangli : सांगलीत महावीर उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी

मध्यरात्रीची घटना; उद्यानातील सीसीटीव्ही बंद

Advertisements

सांगली प्रतिनिधी

शहरातील महावीर उद्यानात मध्यरात्री चोरटे शिरून चंदनाच्या झाडाची चोरी करून पलायन केले. दरम्यान सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱया नागरीकांनी ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने उद्यानातील सुरक्षारक्षक यांना माहिती दिली. ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरटय़ांचा शोध सुरू केला. दरम्यान, शहरातील या उद्यानात सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी नागरीकांची असते. गेल्या काही दिवसांपासून उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरटय़ांनी याचा फायदा घेतला. उद्यानातील सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. रात्री उशीरापर्यंत चोरीच्या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

अधिक माहिती अशी, की चोरी, घरफोडीच्या घटना शहरात वाढल्या आहेत. त्याचबरोबरीने चंदनाच्या झाडाची चोरी करणारी टोळीही सक्रीय झाली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक यांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी चोरटय़ांना गजाआड केले. मात्र, शहरात अन्यत्र अनेक ठिकाणी चंदनाच्या झाडांवर चोरटे लक्ष करत आहेत. येथील महावीर उद्यानात चंदनाची झाडे आहेत. याठिकाणी मार्निंग वॉकर्ससह अबालवृद्धांची मोठी गर्दी याठिकाणी असते. मध्यरात्री चार ते पाच चोरटय़ांनी उद्यानात प्रवेश केला. तेथील चंदनाच्या झाडाची इलेक्ट्रीक कटरच्या सहायाने तोडणी केली. त्यानंतर पुढे मोकळ्या जागेत झाडाचे तुकडे केले आणि बुंधे घेवून चोरटे पसार झाले. सकाळी फिरायला आलेल्या लोकांना झाड तोडल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी काही वस्तूही पडल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाला ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अंमलदार बिरोबा नरळे, सागर लवटे यांच्यासह पथक दाखल झाले होते. त्यांनी पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात नव्हती.

यापुर्वीही प्रयत्न
याच उद्यानात चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा यापुर्वीही प्रयत्न झाला होता. त्यावेळी झाड तोडतांना आवाज आल्याने सुरक्षारक्षक बाहेर आले. त्यामुळे या चोरटय़ांनी पळ काढला. मात्र, ही चोरी करताना झाडाच्या फांद्या दोरीने बांधून सराईतपणे झाडाचा बुंधा चोरी नेण्यात चोरटे यशस्वी झाले.

Related Stories

सांगली जिल्हा नियोजनमधून मनपाला १० कोटी मंजूर

Archana Banage

सांगली : कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन, नेवरीत दोघांवर गुन्हे दाखल

Archana Banage

बेदाणा व्यापाऱ्याची साडेअकरा लाखाची फसवणूक

Archana Banage

‘राजारामबापू’ च्या दूध भुकटी प्रकल्पाचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन

Archana Banage

सांगलीत नवीन 154 रुग्ण वाढले ;तर 225 जण कोरोनामुक्त

Archana Banage

आष्टा येथे घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट

Archana Banage
error: Content is protected !!