Tarun Bharat

अलिबागचा संदीप पाल आणि पालीवाला कॉलेजची ऋतुजा सकपाळ सुवर्णजेते

मुंबई विद्यापीठांतर्गंत कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई विद्यापीठांतर्गत कोकण विभागिय आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला क्रॉसकंट्री स्पर्धेत पुरुष गटात अलिबागच्या पीएनपी महाविद्यालयाच्या संदीप रामचंद्र पाल ने 33.58 मिनीटात तर महिला गटात जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या ऋतुजा जयवंत सकपाळने 44.27 मिनीटात दहा किलोमीअर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजतेपदाचा मान लांजा कॉलेज आणि चिपळूणच्या डीबीजे कॉलेजने मिळवला.

   गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाविद्यालय क्रीडांगण ते कसोप, पुन्हा माघारी अशी दहा किलोमीटरची क्रॉसकंट्री स्पर्धा सोमवारी 22 ऑगस्ट रोजी पार पडली. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील विविध महाविद्यालयातील 168 पुरुष तर 69 महिलांनी सहभाग घेतला होता. याचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरणाल वाहतूक पोलिस निरीक्षक शिरिष सासणे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे चंद्रशेखर केळकर, उप्राचार्य चिंतामणी दामले, प्रभारी प्राचार्य मकरंद साखळकर यांच्यासह  हस्ते झाले. तर विद्यापिठाचे सदस्य जयवंत माने, कोकण विभाग सचिव चंद्रकांत नाईक, डॉ. शिंदे, सहसचिव शशांक उपशेटय़े, डॉ. विनोद उर्फ बाबू शिंदे, राकेश मालप, ऍथलेटिक्स असोसिएशनचे संदिप तावडे उपस्थित होते.

   या स्पर्धेमध्ये एक ते दहा क्रमांक काढण्यात आले. पुरुष गट ः संदिप पाल (पीएनपी कॉलेज), अनिकेत अनंत चांदिवडे (डीबीजे चिपळूण), लक्ष्मण दरवडा (पालीवाला कॉलेज), शाहीद किरलुलकर (वैभववाडी), ओंकार चांदिवडे (चिपळूण), करण माळी (पालीवाला), अनिकेत पवार, यश शिरळकर (लांजा), सुरज शिगवण, संकेत भुवड (डिबीजे चिपळूण). महिला गट ः ऋतुजा सकपाळ (पालीवाला कॉलेज), साक्षी सुभाष पवार (चिपळूण डीबीजे), श्रृती संजय दुर्गवळी (गोगटे कॉलेज) प्रिया कळंबटे, सिध्दी मांडवकर, समिका मांडवकर (सर्व लांजा), सायली घवाळी (गोगटे कॉलेज), तन्वी मरगज (खोपोली), वैशाली गोताड (एएसपी कॉलेज), अक्षता घाडी (एससीएस लांजा). विजयी स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमधून कोकण विभागातील सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरीही ठरवण्यात आला. यामधून मुंबई विद्यापिठाच्या स्पर्धेसाठी कोकण विभागाचा संघ निवडण्यात आला आहे. त्यासाठी निवड समितीही ठेवण्यात आली होती.

Related Stories

वांद्री येथे कार अपघातात 1 ठार, 2 जखमी

Patil_p

चौथा पॉझिटिव्ह, मुंबईहूनच आलेला

NIKHIL_N

लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटी आयोजित पाककला स्पर्धेला शेकडो महिलांचा उदंड प्रतिसाद

Abhijeet Khandekar

पोटच्या मुलीवर शारीरिक अत्याचार

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले

Archana Banage

रत्नागिरी : दापोलीत बुधवारी पावसाचा जोर कायम

Archana Banage