उपसरपंचपदी उन्नती पाडोलकर
प्रतिनिधी /डिचोली
मये मतदारसंघातील नार्वे पंचायतीच्या सरपंचपदी संदेश पार्सेकर यांची तर उपसरपंचपदी उन्नती पाडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि पंचायत मंडळाने आमदार प्रमेंद्र शेट यांची भेट घेतली.
नार्वे पंचायत कार्यालयात सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी पार पडलेल्या विशेष बैठकीस पंचसदस्य संदेश पार्सेकर, उन्नती पाडोलकर, सिद्धेश पार्सेकर, तुकाराम गावडे व सिद्धी नाईक यांची उपस्थिती होती.
सरपंचपदासाठी संदेश पार्सेकर व उपसरपंचपदासाठी उन्नती पाडोलकर यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सर्व पाचही पंचसदस्य एकसंध राहिले.