Tarun Bharat

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून

जालिहाळ बुद्रुक येथील घटना ; आरोपी ताब्यात

संख/प्रतिनिधी

जालिहाळ बुद्रुक (ता. जत) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात बेडग्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. केसराबाई बाळकृष्ण सावंत (वय.४३) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे .ही घटना मंगळवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

संशयित आरोपी पती बाळकृष्ण संदीपान सावंत (वय .५५) यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे . याबाबतची फिर्याद कृष्णा हंबीर पवार रा.वळसंगी (ता. विजयपुर) यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालिहाळ बुद्रुक येथे बाळकृष्ण संदिपान सावंत यांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी (ता. विजयपूर) येथील केसराबाई हिच्याशी झाला होता. संदिपान व केसराबाई यांना तीन मुली आहेत. दरम्यान गेल्या चार महिन्यापूर्वी केसराबाई व आरोपी बाळकृष्ण सावंत यांच्यात पती-पत्नीमध्ये भांडणे होत होती. संशयित आरोपी बाळकृष्ण व पत्नी केसरबाई याच्यांवर चारित्र्य वरून संशय घेत होता. या कारणावरून दोघांच्यात सतत खटके उडत होते. याच कारणावरून चार महिन्यापूर्वी केसराबाई तिच्या माहेरी गेली होती. एक महिन्यापूर्वी बाळकृष्ण सासरवाडी येथे जाऊन समजूत काढून केसराबाई हिला घेऊन आला होता. तरीही अधून मधून त्यांची सतत भांडणे होत होती.

भांडणे होत असल्याची कल्पना तिने तिच्या भावाला दिली होती. मंगळवारी सकाळी पती-पत्नीत यांच्यात राहत्या घरात कडाक्याचे भांडण झाले. यात पती बाळकृष्ण शिव्या देत बेडग्याने केसराबाईच्या डोक्यात वार केला. वार वर्मी बसल्याने केसराबाई यांचा जागीच मृत झाला. याबाबत संशयित आरोपीचे भाऊ गजू संदिपान सावंत यांनी केसराबाई यांच्या माहेरी दोघांमध्ये पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचे सांगितले होते. परंतु या भांडणात केसराबाईचा खून झालेला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. यावेळी घटनास्थळी अतिरिक्त (प्रभारी) उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन कसून चौकशी तपास करण्याच्या सूचना दिल्या संशयित आरोपी यास जालिहाळ बुद्रुक येथून पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.

Related Stories

नांद्र्यात भीषण अपघात; २ ठार, ५ जखमी

Archana Banage

मराठा समाज भवनात अवतरली फुलांची बाग

Archana Banage

उटगी जवळ अपघात दोन दुचाकी जळून खाक

Archana Banage

सांगली : खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही – अनिल पाटील

Archana Banage

सांगलीत पाच जणांचा मृत्यू, 363 नवे रूग्ण

Archana Banage

सांगली : ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडल्यास खबरदार

Archana Banage