Tarun Bharat

कार-कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

कासेगाव/प्रतिनिधी

कासेगाव ता वाळवा येथे आशियाई महामार्गावर येवलेवाडी फाट्यावर शर्यत हॉटेल नजीक कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील ५ जण ठार झाल्याची घटना दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यत जवळ आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर (एमएच ०५ ए एम ३६४४) थांबलेला होता मात्र कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच १४ डी एन ६३३९) ने उभ्या असलेल्या कंटेनरच्या डाव्या बाजूस जोराची धडक दिली. यामध्ये कारमधील चालक अरिंजय आण्णासो शिरोटे (रा. जयसिंगपूर) यांच्यासह एक महिला स्मिता अभिनंदन शिरोटे (वय ३८) व तीन मुले पूर्वा अभिनंदन शिरोटे (वय १४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (वय ०९), वीरेन अभिनंदन शिरोटे (वय ०४) गंभीर जखमी झाले होते यामधील तीघांना उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे तर दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव येथे हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यावेळी महामार्ग काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

मिशन ऍडमिशन! आयटीआयची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

Archana Banage

महागाईचा भडका : फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर दरात वाढ

Tousif Mujawar

योगी आदित्यनाथ पक्षश्रेष्ठींच्या भेटीला

Amit Kulkarni

सांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग

Archana Banage

मुल होत नसल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या

Archana Banage

लॉकडाऊन दिल्लीत, संकट अलीगढात

Amit Kulkarni