Tarun Bharat

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बंडखोरी नाट्यानंतर आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) दुसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. उद्या (शनिवारी दि.१३) ते कोल्हापुरात येणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील पुरस्थितीतचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. दमदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान याकाळात अनेकांनी स्थलांतरही केले. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी उद्या (शनिवारी दि.१३) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. तसेच ते जिल्ह्यातील पूरस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या तीन वाजता आढावा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री सांगली जिल्हा दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने सांगलीकडे रवाना होतील. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री शिंदे हे आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यांनतर ते गार्डी, ता. खानापूर. येथून दुपारी १.३० वाजता मोटारीने कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

Related Stories

आशांना महापूरकाळातील कामाचे मानधन देऊ

Patil_p

हातकणंगले येथे धक्कादायक प्रकार : सर्वच पोलीस कर्मचारी झाले गायब

Archana Banage

Kolhapur; तुळशी धरणातील पाणी कोणत्याही क्षणी सोडणार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Abhijeet Khandekar

घटप्रभा नदी पत्राबाहेर; सर्व बंधारे पाण्याखाली

Archana Banage

वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचे व्हिडीओ रेकॉर्डींग करा; जि.प.सीईओ संजयसिंह चव्हाण यांचे आदेश

Abhijeet Khandekar

पंचगंगा घाट नवीन बांधकामालाच हरकत

Archana Banage