Tarun Bharat

कोल्हापूर, सांगलीतील कृषीपंप ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा

महावितरणचे नियोजन : साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांना दिलासा

प्रतिनिधी/कोल्हापूर

सध्याच्या आपत्कालीन स्थितीत कोल्हापूर व सांगली जिह्यातील कृषीपंप ग्राहकांच्या अखंडित वीज पुरवठय़ाच्या मागणीस महा†वतरणने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कृषी क्षेत्राला अखांडित वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणने नियोजन केल्याने कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

या संदर्भात महावितरणने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे : कृषी वाहिन्यांवर नियमित आठ तास वीज पुरवठा देण्याचे प्रयत्न आहेत. मात्र अकस्मिक स्थितीत भारव्यवस्थापनाची गरज भासल्यास कृषी वीज पुरवठय़ाच्या नियोजित वेळापत्रकाच्या आठ तासातील सुरुवातीस किंवा शेवटास काही अवधीकारिता वीज बंद करून उर्वरित कालावधीत अखांडितपणे, सलग वीज पुरवठा केला जाईल. यामुळे कृषी ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. भारव्यवस्थापनाची परिस्थिती ओढवू नये, यासाठी महावितरण शर्थीचे प्रयत्न करीत आहे. तरी का†षग्राहकांनी सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष
राज्यभर वाढता उष्मा, देशभरातील कोळसा टंचाई, वीज निर्मिती संचाची देखभाल दुरुस्ती या पार्श्वभूमीवर विजेची वाढती मागणी व अपुरा वीज पुरवठा यात समतोल साधून वीज यंत्रणा कोलमडू नये या हेतूने, एकीकडे अत्यावश्यक प्रसंगी आपत्कालीन भारव्यवस्थापनाचा उपाय महावितरणकडून अवलंबला जातो आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी महावितरणने मुख्यालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. राज्यातील परिस्थितीवर हा कक्ष बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्हास्तरावर ही नियंत्रण कक्ष तयार केले आहेत.

तीनहजार मेगावॅट वीजेची तूट
सध्या राज्याची विजेची मागणी 28 हजार मेगावॅट इतकी आहे. तर महावितरणची विजेची मागणी 24 हजार 700 मेगावॅट उच्चांकी आहे. सुमारे 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट भासते आहे. वीज मागणीनुसार वीज उपलब्ध व्हावी, याकरिता कोळसा मिळविण्यासाठी, अतिरिक्त वीज खरेदीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तरी या संकटकालीन स्थितीत नागरिकांनी काटकसरीने वीज वापर करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले
भाररव्यवस्थापन करताना अधिक वीज गळती व वसुलीचे प्रमाण कमी असलेल्या भागातील वीज वाहिन्यांवर आवश्यकतेनुसार भार नियंत्रण करण्यासाठी नाईलाजास्तव अर्धा ते दीड तास वीज बंद केली जाते आहे. वीज गळती व वसुली प्रमाणाधारे 11 के व्ही वीज वाहिन्यांचे ए,बी, सी, डी, ई,एफ,जी1,जी2,जी3असे विभाजन केले आहे. सध्या आपत्कालीन भारव्यवस्थापन ई, एफ, जी1, जी2, जी3 या गटात जिथे वीज हानी 50 टक्केहून अधिक आहे. कोल्हापूर, सांगलीतील बहुतांश भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले असून वीज हानीही कमी आहे.

Related Stories

गांधीनगर पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक; मात्र चोऱ्या रोखण्यात अपयश

Abhijeet Khandekar

सांगली फाटा टोलनाक्यानजिक झालेल्या अपघातात दोन ठार

Archana Banage

सादळे – मादळेसह शिये, जठारवाडी डोंगर पायथ्याला बिबट्याचा वावर

Archana Banage

शासकिय पाणी पुरवठा योजनेतील पाण्याची तपासणी करा

Archana Banage

भरून पावलो, धन्य झालो..!

Archana Banage

४९,९३९ पदवीधर मतदारांची ऑनलाईन नोंदणी

Archana Banage