Tarun Bharat

आरग येथे जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले

प्रतिनिधी/मिरज

तालुक्यातील आरग येथे जेसीबीच्या सहाय्याने एक्सीस बँकेचे एटीएम मशीन फोडण्यात आले. शनिवारी रात्री सव्वा बारा वाजता ही घटना घडली. एटीएम मशिन उचलून पळवून नेत असताना वाहने आल्याने चोरटय़ांनी एटीएम मशिन रस्त्यावरच टाकून पळ काढला. पोलिसांनी सदर एटीएम मशिन आणि जेसीबी ताब्यात घेतले असून, एटीएममधील 27 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित आहे. याबाबत सेक्यूर आर्नेक्ट इंडिया कंपनीचे अधिकारी अशोक साठे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरग येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एक्सीस बँकेचे एटीएम आहे. तेथून जवळच एक पेट्रोल पंपही आहे. या पेट्रोल पंपावर जेसीबी थांबली होती. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी प्रथम पेट्रोल पंपावरील जेसीबीची चोरी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाजवळील एक्सीस बँकेचे एटीएम फोडले. सदरचे एटीएम मशिन बाहेर काढून जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 50 मिटर अंतरावर नेण्यात आले. तेथे मशिन फोडून रक्कम काढली जात असतानाच वाहने आली. पोलिस वाहने असल्याचा संशय आल्याने चोरटय़ांनी एटीएम मशिन रस्त्यावरच फेकून देऊन जेसीबीने पळ काढला.

Related Stories

Himachal Pradesh election : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, १२ नोव्हेंबरला मतदान

Archana Banage

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून इंधन दरवाढीचे समर्थन

Archana Banage

अमेरिका हिंसाचार : 24 राज्यात 17 हजार सुरक्षा सैनिक तैनात

datta jadhav

शिवराजसिंह-कमलनाथ यांच्या ताफ्यातील वाहनांच्या धडकेचे वृत्त खोटे

datta jadhav

पंजाबमधील आमदारांशी राहुल गांधी करणार आज चर्चा!

Tousif Mujawar

केरळची पुनरावृत्ती; कोल्ह्याला खायला घातले स्फोटके भरलेले मांस

datta jadhav