Tarun Bharat

पुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर

रेल्वे खासगीकरणाला विरोध, विविध मागण्यांसाठी आंदोलन

प्रतिनिधी/मिरज

भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध तसेच कर्मचारी भरती प्रक्रियासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्य रेल्वे पुणे विभागातील 380 स्टेशन मास्तर मंगळवारी 31 मे रोजी सामुहीक रजेवर जाणार आहेत. ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनने तशी नोटीस रेल्वे बोर्डाला दिली आहे. या देशव्यापी आंदोलनात 35 हजार स्टेशन मास्टर सहभागी होणार असून, पुणे, सोलापूर विभागातूनही स्टेशन मास्तरांनी एक दिवशीय सामुहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या आहेत मागण्या…
रेल्वेचे खासगीकरण आणि कॉर्पोरायटीझेशन थांबविणे, नवीन पेन्शन योजना बंद करुन जूनी पेन्शन योजना लागू करणे यासह रेल्वेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, कोणत्याही कमाल मर्यादाशिवाय रेल्वे कर्मचाऱ्याना नाईट डय़ूटी भत्ता द्यावा, स्टेशन मास्तर संवर्गात एमएसीपीची लाभ द्यावा, सुधारीत पदनामांसह संवर्गाची पुनर्रचना करावी, रेल्वे सुरक्षित व वेळेवर धावण्यासाठी स्टेशन मास्तरांना सुरक्षा आणि तणाव भत्ता प्रदान करावा, आदी मागण्या रेल्वे स्टेशन मास्तर असोसिएशनने केल्या आहेत.

सदर मागण्यांसाठी ऑक्टोंबर महिन्यात काळ्या फिती लावून तसेच उपाशी पोटी काम करुन आंदोलन केले होते. मात्र, तरीही स्टेशन मास्तर असोसिएशनच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्टेशन मास्तर असोसिएशनने मंगळवारी 31 मे रोजी एक दिवशीय सामुहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेच्या प्रशासकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related Stories

..अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू

Archana Banage

राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी नगरसेवक; चंदेरीनगरीत तातोबा हांडेंना मान

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे दिल्लीतील नेतृत्वाचे कारस्थान

datta jadhav

GST संकलनात 28 टक्क्यांची वाढ; जुलैमध्ये तिजोरीत 1.49 लाख कोटी

datta jadhav

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार; हवामान विभागाकडून ९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट

Archana Banage

“मी मराठी, माझी मराठी!’ बाणा जपू या!” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar