Tarun Bharat

वळसंग-शेड्याळ मधून ६ शेळ्यांची चोरी

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

वळसंग/प्रतिनिधी

जत तालुक्यातील वळसंग व शेड्याळ येथील तीन पशुपालकांच्या प्रत्येकी दोन असे ६ शेळ्या गोठ्यातून चोरीस गेल्या आहेत. या शेळ्याची पन्नास हजार इतकी किंमत होते. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. याबाबतची फिर्याद दर्याप्पा नागाप्पा कोळी यांनी जत पोलिसात दिली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दर्याप्पा कोळी हे शेतकरी असून त्यांचा जोड धंदा पशुपालन आहे. शनिवारी रात्री त्यांच्या घरातील सर्वजण झोपी गेले होते. यावेळी रात्री एक वाजता दर्याप्पा कोळी जागे झाले. यावेळी त्याच्या गोठ्यात दोन शेळ्या दिसल्या नाहीत. शेळयांचे बांधलेले दोर कापलेले दिसले. त्यांनी रविवारी दुपारपर्यंत शेळ्या शोधल्या पण मिळून आल्या नाहीत दरम्यान ,त्यांना गावातलीच महादेव हनमंत कोळी यांच्या वीस हजार किमतीच्या दोन शेळ्या शनिवारी रात्री चोरून नेलयाचे समजले. तसेच शेड्याळ येथील श्रीकांत जगन्नाथ नरूटे यांच्या पंधरा हजार किमतीच्या दोन शेळ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेलयाची माहिती मिळाली. यानंतर तिघांनी मिळून चोरीस गेलेल्या सहा शेळ्यांचा आसपासच्या गावात शोध घेतला .परंतु शेळ्या मिळून आल्या नाहीत. म्हणून त्यांनी सहा शेळ्याची चोरी झाल्याबाबत फिर्याद जत पोलिसात दिली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Advertisements

Related Stories

सांगली : १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध दराबाबत आंदोलन, दूधसंघांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय जिल्ह्यातील कारखाने बंद करू नका ; स्वाभिमानीची मागणी

Abhijeet Shinde

सांगली : राजेवाडी तलावावर पर्यटन फुल्ल,सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा

Abhijeet Shinde

बनावट नोटा बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील २७ नवीन पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

Abhijeet Shinde

सांगली : कुत्र्याच्या हल्ल्यात स्वच्छता निरीक्षक जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!