जत/प्रतिनिधी
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे जत तालुक्यातील गुड्डापुर परिसरात गुरुवारी दुपारपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसाने मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढगाभर पाणी साचले आहे. येथे आलेल्या अनेक दर्शनासाठी भाविकांनी पाण्यातून जात देवीचे दर्शन घेतले. तीर्थक्षेत्र गुड्डापूर जलमय होण्याची ही पहिलीच वेळ आहे.