शिराळा (सांगली); प्रीतम निकम
बौद्ध पौर्णिमेनिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घेतलेल्या निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या वन्यजीव गणनेत बिबट्यासह ३०८ श्वापदांची नोंद झाली आहे. व्याघ्र प्रकल्पात केवळ एकच बिबट्या आढळला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे प्राणीगणना झाली नव्हती दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना मागील वर्षी कोरोनामुळे रद्द झाली आहे. प्राणी गणना प्रामुख्याने व्याघ्र प्रकल्पात होत असते मात्र मागील ती रद्द केली होती. कोरोनामुळे बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राणी गणना करू नका, अशा सूचना वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) नितीन काकोडकर दिल्या होत्या. त्यामुळे वन्यगणना रद्द झाली होती . त्यापूर्वी २०२० मधील बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना झाली होती त्या वेळी वन विभागांतर्गत उपक्रम झालेल्या राबवला होता.
यंदा कॅमेरा ट्रैपिंग आणि अन्य तंत्रज्ञानाने वन्यजीव गणना झाली होती. त्यात लोकसहभाग वाढवला होता. वन्य प्राण्यांसह जंगल व वन्य प्राण्यांविषयी जागरूकता व्हावी, यासाठी वन्यजीव गणनेत लोकसहभाग वाढवला जात आहे. व्याघ्र प्रकल्पात उदमांजरसह राज्य प्राणी शेकरू, मोर, अस्वल यांच्या अस्तित्वाची नोंद झाली आहे. प्रतिवर्षी व्याघ्र प्रकल्पात १६ मे रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना होते. व्याघ्र प्रकल्पाच्या ढेबेवाडी, हेळवाक, चांदोली, कोयना, बामणोली या पाच वनपरिक्षेत्रात एकूण ५४ मचाणांवर निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना पार पडली. या वन्यप्राणी गणनेत बिबट्यासह १५ वन्यप्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले. प्रगणकांकडून भरून घेण्यात आलेल्या वन्य प्राणी गणनेत आढळलेले प्राणी बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्व , वानर, सायाळ, मुंगूस, मोर, रानकोंबडी, शेकरू, उदमांजर असे ३०८ वन्यजीव आढळून आले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री प्राणी गणना करण्यात आली. चांदोली वनपरिक्षेत्र अंतर्गत करण्यात आलेल्या गणनेत सांगली, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील २५ हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निसर्ग अनुभव उपक्रम राबवण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी सर्वश्री संदीप कुभांर, संदीप जोपाळे, नंदकुमार नलवडे, शिशुपाल पवार, बाळकृष्ण हसबनीस आदींनी आप आपल्या वन्यजीव परिक्षेत्रात ही गणना केली. या गणनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यामधून काही ठराविक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. निवड झालेल्या स्वयंसेवकांना निसर्ग अनुभव कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यावरील वन्य प्राणी प्रत्यक्षात पाहून गणना करता आली.या उपक्रमामुळे वन्यजीव प्रेमी तसेच निसर्गप्रेमीना व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलातील मचाणावर चांदण्या रात्री यंदा वन्यजीव पाहता आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष ही मे महिन्यातली बुद्ध पौर्णिमे च्या चांदन्या रात्रीची प्राणी गणना करता आली न्हवती .पण यावर्षी निसर्गप्रेमीना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश होतो .चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत चांदोली हेळवाक , ढेबेवाडी या परीक्षेत्राचा समावेश आहे तर कोयना वन्यजीव अभयारण्य कोयना व बामनोली या परीक्षेत करांचा समावेश आहे दोन्ही संरक्षित क्षेत्रात मिळून एकूण 50 मशीन उपलब्ध करून निसर्गप्रेमी च्या मदतीने ही प्राणी गणना केली उन्हाळ्यामध्ये जंगलातील बहुतांश पाणवठे कोरडे असतात काही ठराविक ठिकाणी पाणीसाठा असल्याने वन्य प्राणी अशा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात अशा पाणवठ्यावर लाकडी मशान बांधले होते प्रत्येक मचाणावर दोन स्वयंसेवक व एक वन कर्मचारी असे तिघांची नियुक्ती केली होती चांदोली वन परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या निवळे झुळम बी सोनाली चांदेल या परिसरात व सेवकांना पर्यंत यासाठी नुकतीच दाखल झालेल्या नवीन बस मधून नेमून दिलेल्या ठिकाणावर सोडण्यात आले होते