गाडीतील तिघांकडे रकमेबाबत चौकशी सुरु
सांगली प्रतिनिधी
सांगलीत कर्नाटक पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत 75 लाख रुपयांची रोकड सापडली. सांगली शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी करून ही गाडी पकडली. गाडीतील तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघांकडे या रकमेबाबत चौकशी सुरु आहे.
सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल समोर ही संशयीत चारचाकी गाडी सापडली. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असून या चारचाकी मधील आकाश नारायण केंगार, सूनील शहाजी कदम आणि महिंद्र लक्ष्मण जावीर असे रक्कम घेऊन जाणाऱ्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही आटपाडी येथील आहेत.
तिघांच्या कडे ही रक्कम कोणाची आहे, ही रक्कम कुठून आणली आणि ती कुठे नेली जात होती याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.