Tarun Bharat

हातनोली येथे वादळी वाऱ्याने घराची भिंत कोसळून एक महिला ठार

तर पिता-पुत्र गंभीर जखमी

संजय पाटील /हातनूर

तासगाव तालुक्यातील हातनोली येथे काल रात्री झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसात राहत्या घराची भिंत झोपलेल्या ठिकाणी झोपेतच अंगावर कोसळून कमल नारायण माळी वय ६८ वर्षे ह्या जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती नारायण साधू माळी वय ७५ वर्षे व मुलगा दीपक नारायण माळी वय १८ वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय त्यांची घराच्या बाजूस बांधलेली देशी गाय ही गंभीर जखमी झाली आहे.

घटनास्थळा वरून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे
रविवारी रात्री  १२ ते १ च्या दरम्यान अचानक झालेल्या विजेचा कडकडाट व  वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरवात झाली. पावसापेक्षा वादळी वारे  भयानक होते ,या सुसाट्याच्या जीवघेण्या वादळी वाऱ्यात नारायण माळी यांच्यां घराची एका बाजू भिंत खिडकी सह  घरात झोपलेल्या कमल माळी, नारायण माळी, हे दाम्पत्य व त्यांचा मुलगा दीपक माळी यांच्यां अंगावर कोसळली. घराच्या भिंतीचे काम हे सिमेंटच्या मोठया विटांनी केले होते. त्यामुळे विटांचे वजन जास्त असल्यामुळे या अपघातात आत झोपले माळी कुटुंबीय विटा खाली गाढले गेले होते. घरावरील सर्व पत्रे वाऱ्याने बाजूच्या शेतात जाऊन पडले होते.

सकाळी शेजारील लोकांनी नारायण माळी यांच्यां घरावरील पत्रे लांब बाजूच्या शेतात पाहून घराकडे धाव घेतली. पाहतात तर माळी कुटुंबातील सदस्य रात्री वादळी वाऱ्याने पडलेल्या भिंती खाली गाडले गेल्याचे दिसून आले. लोकांनी आरडाओरड करून लोकांना गोळा केले आणि विटा बाजूला केल्या परंतु यामध्ये कमल माळी ह्याचा श्वास थांबला होता तर नारायण माळी व दीपक माळी बेशुध्द अवस्थेत होते. लोकांनी तात्काळ ही माहिती हातणोली चे सरपंच हिंदुराव जाधव उपसरपंच काशिनाथ जाधव व पोलीस पाटील कृष्णा जाधव यांना फोन करून माहिती दिली. ते वैद्यकीय अधिकारी यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यावर तासगाव पोलीस ठाण्यात व  तहसीलदार यांना घटनेची माहिती दिली. काहीं वेळातच तहसीलदार रवींद्र रांजणे सर्कल संजय पाटील तलाठी संतोष शिंदे तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी पिता पुत्र यांनाउपचारासाठी सांगली च्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .तासगाव पोलीस व महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला .व मृत कमल माळी यांना तासगावच्या शासकीय रुग्णालयात पुढील कार्यवाही साठी नेहण्यात आले.

नारायण माळी हे कुटुंबीय दररोज रोजंदारी वर कामावर जाऊन उपजीविका करणारे अत्यंत गरीब कुटुंब होते. अत्यंत कष्टाने पै पै गोळा करून तीन मुलीची लग्न केली. व उचला उचल करून नुकते घर बांधले होते अजूनही पैसे मिळतील तसे काम चालूच होते. घटनास्थळी जमलेले प्रत्येक व्यक्ती माळी कुटुंबाविषयी व त्यांच्या परिस्थिती विषयी हळहळत होता. तहसीलदार यांनी ही सर्व परिस्थिती ची माहिती घेतली व गावातील पोलीस पाटील सरपंच यांच्यां कडून माहिती घेतली. माळी कुटुंबियांना जास्तीत जास्त शासकीय मदत सर्वांनी मिळून देऊ असे प्रयत्न करण्याचे आदेश दिले. यावेळी घटनास्थळी शासकीय अधिकारी सह उपसरपंच काशिनाथ जाधव पवन जाधव अजित जाधव, दादासो जाधव विजय डूबल सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिकचा तपास तासगाव पोलिस करीत आहेत

जखमी पैकी मुलगा दीपक माळी यांच्यां डोक्यावर खिडकी व सिमेंट ची वीट पडल्यामुळे त्यांची परिस्थिती अति गंभीर तर वडील नारायण माळी यांचा एक पाय मोडला असून तेही अजून गंभीर असल्याचे माहिती मिळाली

तर मृत कमल माळी यांच्यां मृतदेहावर अत्यंत शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार सायंकाळी करण्यात आले. या गरीबरोजंदारी करून उपजीविका करणाऱ्या माळी कुटुंबावर ओढवलेल्या या अवचित आवकाळीने ओढवलेल्या आपत्तीची हळहळ व्यक्त आहे.

Related Stories

विटा, आष्टा आणि पलूस नगरपालिकेत प्रशासकराज

Archana Banage

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शहर; हाय अलर्ट जारी

Tousif Mujawar

रविवारी सर्वपक्षीय बैठक; PM मोदीही राहणार उपस्थित

datta jadhav

Sangli : बिहारमध्ये टेम्पो अपघातात घोलेश्वरचा एकजण ठार; एक जखमी

Abhijeet Khandekar

सांगली : वाळवा तालुक्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

Archana Banage

माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

datta jadhav