कासेगाव प्रतिनिधी
वाळवा ( walwa ) तालुक्यातील नेर्ले ( Nerle ) येथिल आशियाई महामार्गावर झालेल्या अपघातात पादचारी वैभव जयवंत भोसले वय २९ रा. कामेरी हे ठार झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव जयवंत भोसले हे नेर्ले बस स्थानकाजवळून आशियाई महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत डोक्याला व पायांना गंभीर इजा होऊन ते जागीच ठार झाले आहेत. मयतास उत्तरीय तपासणीसाठी कासेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून प्रशांत तानाजी भोसले यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात ( Kasegoan ) फिर्याद दिली आहे. अधिक तपास कासेगाव पोलीस करत आहेत.
अधिक वाचा;
Shirala (sangli) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मागितली ३ लाखांची खंडणी, वाचा पुढे काय झालं….
https://tarunbharat.com/shirala-sangli3-lakh-ransom-demanded-for-torturing-a-minor-girl/