Tarun Bharat

शाब्बास! अटलांटा Cricket लिगमध्ये सांगलीच्या अंकुर माळीच्या टिमने मारली बाजी

Advertisements

सांगली : अमेरिकेतील अटलांटा येथे खुप मोठी व मानाची समजली जाणारी क्रिकेट लिग जिंकली आहे. सांगलीच्या अंकुर माळी यांच्या शार्कस् टिमने..! कळंबी ता. मिरजचे सुपुत्र असलेल्या अंकुर माळी यांच्याकडे या टिमचे कर्णधारपद होते. अमेरिकेसारख्या परकीय देशातील अटलांटा येथे सर्वात नामांकित समजली जाणारी अटलांटा क्रिकेट लीग शार्कस् क्रिकेट टीमने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

या लीगमध्ये १० पेक्षा जास्त देशांचे स्पर्धक सहभागी असतात आणि जवळपास १०० टीम भाग घेतात. यामधून यावर्षी शार्कस् या टीमने बाजी मारली आहे आणि अभिनंदनची बाब म्हणजे ह्या टीमचे कप्तान सांगलीचे अंकुर माळी आहेत. अटलांटा क्रिकेट लीग ही अमेरिकेतील सर्वात अवघड क्रिकेट स्पर्धा मानली जाते आणि त्यात माळी यांच्या टीमने बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंकुर माळी यांचे शिक्षण बीई कॉम्प्युटर सायन्स शिवाजी युनिव्हर्सिटीत झाले आहे. ते अमेरिकेत ६.५ वर्षापासून सेटल आहेत. ते अमेरिकेतसुद्धा सांगलीची आठवण म्हणून ‘एमएच १० एएलएम’ या क्रमांकाची गाडी वापरतात. याची बातमी सर्व वृत्तपत्रातून झळकली होती. यामुळे ते चर्चेत आले होते.

आता क्रिकेट टिमचे कर्णधारपद भूषवून मानाची क्रिकेट लीग जिंकण्याचीही कामगिरी त्यांनी करुन दाखविली आहे. ही टीम मागील चार वर्षे सेमी फायनलमध्ये पोहोचत होती. प्रत्येकवेळी विजयाची हुलकावणी मिळाल्यानंतर यावर्षी मात्र सगळे रेकॉर्ड मोडत काढीत त्यांनी लीग आपल्या नावावर केली. संपूर्ण अटलांटाला ही टीम जिंकावी, असे वाटत होते. या टिममध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, वेस्ट इंडिज, पाँडिचेरी येथील खेळाडू सहभागी होते.

Related Stories

अखेर बेपत्ता मनोज गडकरीचा मृतदेह सापडला

Abhijeet Khandekar

पाकिस्तानचा भारताला पराभवाचा धक्का

Patil_p

कॉम्प्टन, वॉनच्या विक्रमाशी रूटची बरोबरी

Patil_p

‘स्वाभिमानी’ने पाडले आले खरेदी व्यवहार बंद; व्यापाऱ्यांचा माफीनामा

Abhijeet Khandekar

विंडीज संघात ड्वेन ब्रॅव्होचे पुनरागमन

Patil_p

वरिष्ठ महिलांच्या टी-20 स्पर्धेत मिताली खेळणार

Patil_p
error: Content is protected !!